आत्महत्येचं पाऊल उचलणाऱ्या मोहम्मद शमीची अशी आहे 'हेट स्टोरी!'

    16-Nov-2023
Total Views |

Mohammad Shami


मुंबई :
आयसीसी विश्वचषक २०२३ च्या उपांत्य फेरीत भारताने न्यूझीलंडचा पराभव करत अंतिम सामन्यात आपले स्थान निश्चित केले आहे. दरम्यान, उपांत्य फेरीत एका खेळाडूंचे नाव सध्या चांगलेच चर्चेत आहे ते म्हणजे मोहम्मद शमी. मोहम्मद शमीला या विजयाचे श्रेय दिले जात आहे.
 
मोहम्मद शमीने या सामन्यात ७ विकेट घेत न्यूझीलंडचा पराभव केला आहे. त्यामुळे त्याचे सर्वत्र कौतूक केले जात आहे. मात्र, याच मोहम्मद शमीने कधीकाळी आत्महत्येचं पाऊलदेखील उचललं होतं. त्याच्या आयुष्यातला एक काळ असा होता जेव्हा त्याच्या मनात तीनवेळा आत्महत्येचा विचार आला होता.
 
मोहम्मद शमीने २०२० मध्ये एका लाईव्हदरम्यान याबाबतचा खुलासा केला होता. यावेळी तो म्हणाला की, "२०१५ च्या वर्ल्ड कपमध्ये मला दुखापत झाली. त्यानंतर पुनरागमन करण्यासाठी मला १८ महिने लागले आणि तो माझ्या आयुष्यातील सर्वात कठीण काळ होता. दुसरीकडे काही कौटुंबिक समस्यादेखील होत्या."
 
"त्याचवेळी आयपीएलच्या १०-१२ दिवसांआधी माझा अपघात झाला आणि समाज माध्यमांवर माझ्या खाजगी आयुष्यावरही बरंच काही सुरु होतं," असे त्यांने सांगितले. तसेच "जर तेव्हा मला माझ्या कुटुंबाचा पाठिंबा मिळाला नसता तर मी क्रिकेट सोडले असते. मी तीन वेळा आत्महत्या करण्याचा विचारही केला. माझ्या कुटुंबातील कोणीतरी माझ्यावर लक्ष ठेवण्यासाठी सतत माझ्याजवळ बसून असायचं. माझे घर २४व्या मजल्यावर असल्याने माझ्या घरच्यांना भीती वाटत होती की, मी अपार्टमेंटमधून उडी मारेन," असेही मोहम्मद शमीने सांगितले होते.

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.