राऊतांचा तो आक्षेपार्ह बॅनर लावणाऱ्यांवर कारवाई करा : सुनील राऊत
16-Nov-2023
Total Views |
मुंबई : खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अंतर्वस्त्राबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे जोरदार पडसाद उमटले. मुलुंडमध्ये राऊत यांच्याविरोधात निदर्शने करताना त्यांचा राष्ट्रवादीची अंतर्वस्त्र घातलेले बॅनर झळकवण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कुणाची अंडरविअर घालतात हे तपासायला हवे. असं राऊत म्हणाले होते. यानंतर लागलेल्या ह्या बॅनर्सवर सुनील राऊतांनी प्रतिक्रिया दिली आहे.
सुनील राऊत म्हणाले, "आम्ही सर्व काल पोलिस निरीक्षकांना भेटलो. यासंदर्भात कारवाई करतो असं त्यांनी सांगितलं. मात्र कारवाई झाली नाही. म्हणुन मुलुंड, विक्रोळीतील पदाधिकाऱ्यांनी डीसीपींची भेट घेतली आहे. जर दोन दिवसांत कारवाई झाली नाही तर, संजय राऊतांच्या नेतृत्वाखाली आम्ही या ठिकाणी मोर्चा आणु. यानंतर डीसीपींनी आदेश दिलेला आहे. योग्य ती कारवाई करू." असं सुनील राऊत म्हणाले.