मनी लाँडरींग हा संजय राऊतांचा आवडीचा विषय : नितेश राणे

    16-Nov-2023
Total Views |

Nitesh Rane 
 
 
मुंबई : मनी लाँडरींग हा संजय राऊतांचा खास आवडीचा विषय आहे. अशी टीका आमदार नितेश राणे यांनी खासदार संजय राऊतांवर केली आहे. ठाकरे गटाचे उपनेते अद्वय हिरेंना नाशिक ग्रामीण पोलिसांनी भोपाळमधून ताब्यात घेतले आहे. राजकीय दबावतंत्रातून अद्वय हिरेंना अटक करण्यात आल्याची टीका संजय राऊत यांनी केली. याला नितेश राणेंनी प्रत्त्युत्तर दिले आहे. काही महिन्यांपूर्वी मालेगाव तालुक्यातील रमझानपुरा पोलिस ठाण्यात अद्वय हिरे वर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता. रेणुका सूतगिरणीकडून साडेसात कोटी कर्ज घेतले होते. ते न फेडल्याने ३० कोटींवर रक्कम गेली होती. त्यामुळे अद्वय हिरे यांच्यावर ४२० अंतर्गत फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता.
 
 
 
नितेश राणे म्हणाले, "मनी लाँडरींग हा संजय राऊतांचा खास आवडीचा विषय आहे. सकाळी त्यांना याबद्दल फार मिरच्या झोंबल्या. मात्र, पत्राचाळीच्या घोटाळ्यातील जो पैसा यायचा तो प्रवीण राऊतांद्वारे सामना कार्यालयात पोहोचायचा की नाही हा सवालही त्याला विचारायला हवा. सुजीत पाटकरांच्या सोबत कधी खाणकाम, कधी वाईनचे धंदे कधी खिचडी घोटाळा हे धंदे करून घेतले आणि पैसे स्वतःच्या मुलीच्या नावावर फिरवले. अद्वैत हिरेच्या नावाने फार थयथयाट सुरू आहे कदाचित हा त्यांच्याच शाळेतील विद्यार्थी आहेत. हे सरकार महायुतीचं आहे त्यामुळे जे गुन्हेगार असतील त्यांना शिक्षा ही होणारच." अशा तिखट शब्दांत या प्रकरणावर राणेंनी प्रत्युत्तर दिले आहे.