शरद पवारांची जात कोणती? वादावर स्वतः पवारांनीच दिलं उत्तर!, म्हणाले, "माझी जात..."

    15-Nov-2023
Total Views |
sharad pawar on Viral school certificate

मुंबई
: काही दिवसांपुर्वी शरद पवारांच्या व्हायरल झालेल्या शाळेच्या दाखल्यावर आता खुद्ध शरद पवारांनी स्पष्टीकरण दिलेले आहे. पवार म्हणाले की, माझा मराठा जात असलेला दाखला खरा आहे. परंतु काही लोकांनी इंग्रजीतला खोटा दाखला सोशल मीडियावर व्हायरल केला. मुळात माझी जात मी लपवत नाही, संपुर्ण जगाला माहिती आहे.माझी जात कोणती आहे. आणि मी जातीच्या नावावर राजकारण केलेलं नाही, असे ही पवार म्हणाले.
 
दरम्यान शरद पवार हेच मराठा आरक्षणाचे मारेकरी हे मी पुरावनिशी उघड पाडले म्हणून मला गुंड प्रवृत्तीच्या लोकांकडून धमक्या येत आहेत. आता आम्हाला संरक्षण पुरवण्याची जबाबदारी महाराष्ट्र पोलिसांची आहे. सोबतच पुरोगामी विचारांच्या महाराष्ट्रात हे होत आहे या गुंड प्रवृत्तीचा निषेध, असे विधान व्याख्याते, लेखक नामदेवराव जाधव यांनी केले. सोबत त्यांनी वन इंडिया या संकेतस्थळाचा दाखला दिलायं. ज्यात पवारांचे पूर्ण नाव नाव, जन्म ठिकाणी, जन्मतारीख, पक्षाचं नाव, व्यवसाय, धर्म आणि त्याखाली जातीचा उल्लेख करण्यात आलाय. ज्यात शरद पवारांच्या जातीचा उल्लेख ओबीसी असा करण्यात आलाय. पवारांची जात ही ओबीसी असल्याचं दाखवत पवार मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या विरोधात आहेत, असा आरोप जाधव यांनी पवारांवर केला.


 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.