मुंबई : बॉलिवूड अबिनेता शाहरुख खान याची प्रमुख भूमिका असलेल्या जवान चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर १ हजारांच्या घरात कमाई केली. दाक्षिणात्य दिग्दर्शक ॲटली यांचे हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण असलेल्या जवान चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनात जागा निर्माण केली. पहिल्या चित्रपटाच्या अभूतपुर्व यशानंत दिग्दर्शक ॲटलीने शाहरुख खानसोबत पुन्हा एका नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे. महत्वाची बाब म्हणजे यात दाक्षिणात्य सुपरस्टार विजय थलापथी देखील झळकणार आहे.
दरम्यान, ‘जवान’ चित्रपटाच्या प्रदर्शना आधीच शाहरुख खान आणि विजय थलापथी एकत्र दिसणार अशी चर्चा रंगली होती. पण तसे घडले नाही. आता याबद्दल स्वत: ॲटलीने एका मुलाखतीत माहिती दिली असून लवकरच हे दोन सुपरस्टार एकत्र मोठ्या पडद्यावर दिसणार आहेत.
तमिळ टीव्ही प्रेझेंटर आणि यूट्युबर गोपीनाथ यांच्याशी संवाद साधताना अॅटली म्हणाला, “चित्रपटातल्या ‘जिंदा बंदा’ गाण्याच्या शूटिंगनंतर माझा वाढदिवस सेलिब्रेट करण्यात आला. त्यावेळी शाहरुख खान सर आणि विजय थलापथी सुद्धा होते. मी माझ्या बर्थडे पार्टीला आमंत्रित करण्यासाठी विजयला फोन केला होता. तेव्हा शाहरुख सर आणि विजयची चित्रपटाविषयी चर्चा झाली. मग त्यांनी मला बोलावलं आणि ते म्हणाले की, जर तू दोन हिरो असलेला चित्रपट बनवण्याचा विचार करत असशील तर आम्ही दोघं तयार आहोत. यावर विजयनेही होकार दिला. त्यामुळे मी आता आगामी चित्रपटावर काम करीत आहे,” अशी माहिती या मुलाखतीत अॅटलीने दिली.