भविष्यात ठाकरे-पवारांचं राजकारण यशस्वी होईल : राऊत

    15-Nov-2023
Total Views |

Pawar


मुंबई
: शरद पवार आणि अजित पवारांच्या दिवाळी भेटीबद्दल बोलताना राऊतांनी पुन्हा एकदा अजितदादा गटावर टीका केली आहे. "कितीही गाठीभेटी होऊद्यात बारामतीचं मैदान शरद पवारच मारतील," असा दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी केली आहे. तसेच भविष्यात उद्धव ठाकरे आणि शरद पवार हेच महाराष्ट्राच्या राजकारणात यशस्वी होतील, असं वक्तव्य राऊतांनी केलं आहे. राऊतांच्या जन्मदिनालाच त्यांच्या जन्मतारखेचा वाद उघड झाला आहे. यावर नितेश राणेंनी टीका करत नेमकी खरी तारीख कुठली आहे याचं उत्तर द्यावे, असा सवालही त्यांनी विचारला आहे.
दरम्यान संजय राऊत म्हणाले की, "दिवाळीनंतर उद्धव ठाकरे संपूर्ण महाराष्ट्रात दौरा करणार आहेत. उबाठा गटात महाराष्ट्रातल्या सर्व संघटनात्मक बांधणी तेव्हा केली जाईल. तसेच बारामतीचं मैदान हे शरद पवारच राखणार आहेत. अजितदादा कितीही सोबत दिसत असले तरीही त्यांना धुळ चारल्याशिवाय शरद पवार गप्प बसणार नाहीत. महाराष्ट्राचं राजकारण भक्त भविष्यात ठाकरे आणि पवारांच्याच भोवती चालणार आहे.", असा विश्वास राऊतांनी व्यक्त केला आहे.