मुंबई : भारत आणि न्यूझीलंड मध्ये बुधवार दि. १५ नोव्हेंबर रोजी सेमीफायनलची मॅच रंगणार आहे. मुंबईतील वानखेडे स्टॅडियमवर ही मॅच होणार असून संपुर्ण क्रिकेटप्रेमींचे लक्ष या सामन्याकडे लागले आहे. सामान्यांपासून ते कलाकारांपर्यंत सगळेच या सामन्यासाठी उत्सुक असून दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत देखील मुंबईत हा रंजक सामना पाहण्यासाठी दाखल झाले आहेत. काल १४ नोव्हेंबर रोजी रात्री उशिरा रजनीकांत मुंबईत आले.
आपल्या मायभूमीवर खेळल्या जाणाऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात टीम भारताने विजयाच्या आशा उंचावल्या आहेत. भारताच्या टीमला शुभेच्छा देण्यासाठी रजनीकांत थेट मुंबईत आले आहेत. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर दुपारी २ वाजता हा सामना सुरु होणार असून, या सामन्याकडे सर्वांचे विशेष लक्ष लागले आहे.