मुंबई : अभिनेते नाना पाटेकर यांचा एक व्हिडिओ सध्या समाज माध्यमावर धुमाकुळ घालत आहे. वाराणसीत एका चित्रपटाच्या चित्रिकरणादरम्यान एक फॅन नाना पाटेकर यांच्याकडे सेल्फी काढण्यासाठी आला असता त्याला रागात नानांनी फटकारल्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला असून त्यांच्या या वागणूकीमुळे त्यांना ट्रोल केले जात आहे.
एका युझरने असे म्हटले आहे की, “कलाकार हे दोन कवडीचे असतात, त्यांच्यासोबत सेल्फी काढून स्वत:ला लहान समजून घेऊ नका”. तर दुसऱ्या एका युझर्सने असे म्हटले आहे की, “नाना तुम्ही मोठे कलाकार आहात पण आपल्या चाहत्यासोबत वागण्याची ही कोणती पद्धत?”.
आणखी एकाने म्हटले आहे की, “नानांचा राग असाच आहे चाहत्यांनाही नाना काही सोडत नाही”. आणखी एका युझर्सनं म्हटले आहे की, नाना आम्ही तुम्हाला देशातील मोठ्या कलाकारांपैकी एक मानतो, पण याचा अर्थ असा नाही की, तुम्ही चाहत्यांना मारहाण करायची.