“आईने माझे आणि सुशांतचे सगळे फोटो फाडले”; अंकिताने केला खुलासा

    15-Nov-2023
Total Views |
 
ankita and sushant
 
मुंबई : हिंदी मालिकांमधून अभिनयाच्या जोरावर पुढे चित्रपटांमध्ये अढल स्थान निर्माण करणारा अभिनेता सुशांत सिंग राजपूत फार लवकरच या जगातून निघून गेला. 'पवित्र रिश्ता' या मालिकेमुळे सुशांत सिंग प्रेक्षकांपर्यंत तर पोहोचलाच पण याच मालिकेतून अंकिता लोखंडे आणि सुशांत सिंगची जोडी देखील लोकप्रिय झाली. ही जोडी ऑनस्क्रीन प्रमाणेच ऑफस्क्रीन सुद्धा प्रचंड गाजली. अनेक वर्ष ते दोघेही रिलेशनशिपमध्ये होते. मात्र, त्यांच्या विभिक्त झाल्यानंतर दोघांचेही फोटो अंकिताच्या आईने फाडून टाकल्याचा खुलासा स्वत: अंकिता लोखंडे हिने केला आहे. सध्या ती हिंदी बिग बॉस १७ मध्ये सहभागी झाली आहे.
 
बिग बॉसच्या घरात जाण्यापुर्वी अंकिता लोखंडे हिने बीबीसी न्यूज हिंदीला एक मुलाखत दिली होती. या मुलाखतीमध्ये तिच्या आईने सुशांतसोबतचे सगळे फोटो फाडून टाकले असा खुलासा तिने केला होता. अंकिता म्हणाली, "अडीच वर्ष मी सुशांतची वाट पाहिली. मला आशा होती की सगळं काही सुरळीत होईल. पण, एक दिवस..तो ३१ जानेवारीचा दिवस होता..माझ्या घरी आमच्या दोघांचे खूप फोटो होते. आणि, त्या दिवशी मी ठरवलं आईला सांगितलं हे सगळे फोटो काढून टाक. आयुष्यात दुसरं कोणीतरी यावं, यासाठी आधीची जागा रिकामी करायला हवी", असं अंकिताने सांगितलं. पुढे ती म्हणाली, "मी सांगितल्याप्रमाणे माझ्या आईने सगळे फोटो काढून फाडून टाकले. मी आईला सांगितलं जोपर्यंत सुशांत इथे आहे तोपर्यंत कोणीही माझ्या आयुष्यात येऊ शकणार नाही. मी फोटो काढले नाही, ते मी माझ्या आईला सांगितलं. ज्यावेळी मी माझ्या खोलीत गेले त्यावेळी आईने फोटो फाडून टाकले होते. त्या दिवशी मी खूप रडले. पण तोच आमच्या नात्याचा, वाट पाहण्याचा शेवट होता. मी त्याची खूप वाट पाहिली पण तो आलाच नाही, त्यानंतर ६ महिन्यांनी विकी माझ्या आयुष्यात आला आणि नंतर आमचे लग्न झाले."
 
सुशांत खूप शांत आणि मेहनती होता 
 
अंकिता लोखंडे म्हणाली, “सुशांत खूप शांत होता. तो खूप मेहनती होता. तो थोडासाही वर-खाली झाला तर त्याला काळजी वाटायची. समाज माध्यमावर त्याच्याबद्दल कोणी काहीही बोललं तरी त्याचा ते विचार करायचा. कारण खुप कमी वयात आणि काळात त्याला हे यश मिळाले होते”, असे डोळ्यांच्या कडा पाणावत अंकिता म्हणाली.
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.