मुंबई : पाकिस्तानमध्ये आणखी एक दहशतवादी मारला गेला आहे. मोहम्मद मुझामिल असे त्याचे नाव असून तो लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेशी संबंधित आहे. एका अज्ञात व्यक्तीने गोळ्या झाडून त्याची हत्या केली आहे. बुधवार १५ नोव्हेंबर रोजी पाकिस्तानातील सियालकोट येथे ही घटना घडली.
ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये दोन व्यक्ती दुचाकीवर येत मोहम्मद मुझामिलवर गोळ्या झाडून तिथून पळून जाताना दिसत आहेत. दरम्यान, दोन दिवसांपुर्वी पाकिस्तानातील कराचीमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या एका दहशतवाद्याला अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या घालून ठार केले आहे.
मौलाना तारिक रहिमुल्ला तारिक त्याचे नाव असून तो जैशचा संस्थापक मसूद अझहरच्या जवळचा असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानंतर आता पुन्हा लष्कर-ए-तोयबाच्या मोहम्मद मुझामिल या दहशतवाद्याची अज्ञात हल्लेखोरांनी हत्या केली आहे.