भारतीय गोलंदाजांसमोर 'या' तीन किवी फलंदाजांचे असेल आव्हान; जाणून घ्या

    15-Nov-2023
Total Views |
New Zealand Best Batter put Indian Bowlers in trouble

मुंबई :
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सुरू असलेल्या उपांत्य सामना रंगतदार होण्याची शक्यता आहे. कारण वानखेडेवरील खेळपट्टी ही संथ असून फलंदाजीसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. दरम्यान, भारताने टॉस जिंकत भारताने म्हणूनच प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. तसेच, दुसऱ्या इंनिगमध्ये गोलंदाजी करताना ड्यू फॅक्टर असू शकेल परंतु, वाऱ्याच्या साथीमुळे चेंडू स्विंग होण्यास थोडीफार मदत मिळू शकते.

दरम्यान, भारतीय गोलंदाजांना न्यूझीलंडच्या विकेट्स घ्यायच्या असतील तर फार मेहनत करावी लागणार आहे. किवींचा बॅटिंग स्टान्स उत्तम असून सलामीवीर डेव्हिड कॉन्वे आणि रचिन रवींद्र यांचे मोठे आव्हान असेल. युवा डावखुरा फलंदाज रचिनने भारताविरुध्द साखळी सामन्यात उत्तम खेळी केली होती.

तसेच, कर्णधार केन विलियमसन याचा परफॉर्मन्स फारसा चांगला नसला तरी संघाला मोठ्या खेळीची गरज असताना त्याने उत्तम खेळही केला आहे. तसेच, कर्णधार या नात्याने टीमला प्रोत्साहित करून मॅचमध्ये निर्णायक क्षण आणण्याची क्षमता त्याच्यात आहे. 
मधल्या फळीतील फलंदाज डरेल मिचेल हासुध्दा तितकाच घातक फलंदाज भारतासाठी ठरू शकतो. भारताना भेदक माऱ्यासह किवींच्या फलंदाजीचं कबंरडं मोडणं अत्यावश्यक असणार आहे. खरंतर, पहिल्या १० षटकांत म्हणजेच पावरप्लेमध्ये भारताला चांगल्या गोलंदाजीची गरज असणार आहे. जेणेकरून न्यूझीलंड संघाची सलामीची जोडी लवकर तंबूत परतू शकेल.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.