बीड : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगेंच्या तिसऱ्या टप्प्यातील आंदोलनाला सुरुवात झाली आहे. १५ नोव्हेंबरपासून ते महाराष्ट्र दौरा करणार आहे. बीड जिल्ह्यातील पेंडगावमध्ये ते दाखल झाले असून यावेळी त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले आहे.
धाराशीव येथील वाशीमधून मनोज जरांगे पाटील यांचा दौरा सुरु होणार आहे. याठिकाणी फुलांची उधळण करुन त्यांचे स्वागत करण्यात येणार आहे. वाशीमध्ये माळी समाजबांधवांकडून त्यांचे स्वागत करण्यात येणार आहे. त्यानंतर याठिकाणी त्यांची सभा पार पडणार आहे.
दरम्यान, मनोज जरांगे यांनी सरकारला २४ डिसेंबरपर्यंत मुदत दिली आहे. त्यानुसार सरकारकडून मराठा समाजातील लोकांच्या कुणबी नोंदी शोधण्याचे काम सुरु आहे. धाराशिव जिल्ह्यातील वाशी आणि परंडा तसेच सोलापूर जिल्ह्यातील करमाळा याठिकाणी मनोज जरांगे यांची सभा पार पडणार आहे.