"भारतात विकला जाणारा प्रत्येक मोबाईल हा भारतातच बनतो"; अमिताभ कांत यांचे राहुल गांधींना आकडेवारीतून उत्तर

    15-Nov-2023
Total Views |
 pli-smartphone
 
नवी दिल्ली : मध्य प्रदेश निवडणूकीत प्रचारादरम्यान काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी भारताच्या मोबाईल उत्पादनावरुन तथ्यहीन वक्तव्य केले होते. त्यावर त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी खडेबोल सुनावले आहे. पण राजकारणा व्यतिरिक्त विचार करायचा झाल्यास सुद्धा मागच्या एका दशकात भारताने मोबाईल उत्पादनात क्रांती केली आहे.
 
आजघडीला भारत मोबाईल निर्मितीत जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे. अशी माहिती जी-२० शिखर परिषदेचे शेर्पा अमिताभ कांत यांनी दिली आहे. त्यासोबतच त्यांनी मोबाईल उत्पादन भारताने कशाप्रकारे आघाडी घेतली आहे, याची पण विस्तृत माहिती दिली.
 
अमिताभ कांत म्हणाले की, २०२३ मध्ये भारतीय बाजारपेठेत विकले गेलेले सर्व फोन हे मेड इन इंडिया होते. 2022 मध्ये हा आकडा ९८ टक्के होता. तर २०१४ मध्ये भारताने ८१ टक्के मोबाईल फोन चीनमधून आयात केले होते. भारत आता जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा मोबाईल उत्पादन करणारा देश आहे.
 
एवढेच नाही तर भारताने २०१४ ते २०२२ पर्यंत २ अब्ज मोबाईल हँडसेटचे उत्पादन केले आहे. भारतात उत्पादित होणारे सुमारे २० टक्के मोबाईल हँडसेट इतर देशांमध्ये निर्यात केले जातात. आज चीनच्या कंपन्यासुद्धा भारतात मोबाईल फोनची निर्मिती करतात. त्यासोबतच जगातील दिग्गज मोबाईल निर्माता कंपनी अॅपल सुद्धा भारतात मोबाईलचे उत्पादन घेत आहेत.
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.