कोहलीची फलंदाजी आणि शमीच्या गोलंदाजीने भारताचा विराट विजय; १२ वर्षानंतर विश्वचषकाचा अंतिम सामना खेळणार

    15-Nov-2023
Total Views |
 india
 
मुंबई : वानखेडे स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या ’विश्वचषक’ किके्रट स्पर्धेतील उपांत्य सामन्यात भारताने न्यूझीलंडवर 70 धावांनी दणदणीत विजय संपादन करून अंतिम फेरी गाठली. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या भारताने विक्रमवीर विराट कोहली आणि श्रेयस अय्यरच्या शतकांच्या जोरावर ‘विश्वचषका’च्या उपांत्य फेरीत धावांचा डोंगर उभा करून, न्यूझीलंडला 398 धावांचे लक्ष्य दिले.
 
हे आव्हान न्यूझीलंडला पेलवणार नाही, असे वाटत असताना न्यूझीलंडच्या फलंदाजांनीही चांगली फलंदाजी करून भारताची चिंता वाढविली. परंतु, मोहम्मद शमीच्या भेदक गोलंदाजी पुढे विश्वचषक क्रिकेट भारत फायनलमध्ये न्यूझीलंडचे फलंदाज मोठे फटके मारण्याच्या नादात बाद झाले. न्यूझीलंड संघाने 48.5 षटकांत सर्वबाद 327 धावा केल्या.
 
भारताकडून शमीने 9.5 षटकात 57 धावे देत सात बळी टिपले. तो सामनावीर ठरला. जसप्रित बुमरा, कुलदीप यादव, मोहम्मद सिराजने प्रत्येकी एक बळी टिपला. विराट कोहलीने 50वे एकदिवसीय शतक झळकावत 117 धावांची खेळी खेळली. श्रेयस अय्यरने 105 धावा केल्या.
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.