छत्रपतींचा पुतळा तोडणाऱ्या कमलनाथ यांना फडणवीसांनी विचारला जाब!

15 Nov 2023 17:26:25
Devendra Fadnavis

पांढुर्णा
: भगवान बिरसा मुंडांनी इंग्रजांना सळो की पळो करून सोडलं आणि आदिवासींना जल , जगलं आणि जमीनीवरचा अधिकार परत मिळवून दिला. सावकारी व्यवस्थेने माणसांच्या जगण्याचा अधिकार काढून घेतला होता. तेव्हा भगवान बिरसा मुंडा यांनी लोकांमध्ये जागृती निर्माण केली, असे विधान देवेंद्र फडणवीसांनी केले. ते भगवान बिरसा मुंडा जयंती निमित्त आणि मध्य प्रदेशातील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पांढुर्णा येथे बोलत होते. त्यावेळी त्यांनी कमलनाथ यांच्यावर टीका केली. फडणवीस म्हणाले की, बजरंगबलीला दिलेलं वचन तोडणारे कमलनाथ यांना बजरंगबलीचा आशीर्वाद मिळू शकत नाही. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तोडणारे सुद्धा हेच कमलनाथ असल्याचे सांगत, ते राष्ट्रीय आहेत की औरंगजेबाचे आहेत, असा प्रश्न उपस्थित करत फडणवीसांनी कमलनाथ यांच्यावर टीका केली. तसेच छत्रपतींचा अपमान करणारे मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री होऊ शकत नाही, असे ही फडणवीस म्हणाले.

दरम्यान जनजाती कल्याण दिवसांच्या निमित्तांने पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जनजाती क्षेत्राकर्ता २४ हजार कोटींची योजना जाहिर केली. पंतप्रधानांनी सुरु केलेली योजना ही आदिवासी समाजाच्या विकासासाठी त्यांच्या कल्याणासाठी फार महत्त्वाची आहे. त्यामुळे देशातील शेवटच्या टोकाला असणाऱ्या आदिवासी बांधवाचा देखील विकास व्हायला पाहिजे यासाठी पंतप्रधांनानी ह्या योजना आणल्याचे फडणवीसांनी सांगितले. त्याचबरोबर महिलांच्या विकासाशिवाय देश प्रगती करु शकत नाही. त्यामुळे मोंदींनी वेगवेगळ्या योजना महिलांसाठी सुरु केल्या त्यांना संसदेत आरक्षण दिले, असे ही फडणवीसांनी सांगितले.

 
Powered By Sangraha 9.0