दिवाळी सणाला गालबोट! बस उलटून ३६ ठार

    15-Nov-2023
Total Views |

Jammu-Kashmir


मुंबई :
जम्मू-काश्मीरमधून एक धक्कादायक घटना पुढे आली आहे. जम्मू-काश्मीरमधील डोडा इथे एका प्रवासी बसचा रस्त्यावरुन खाली घसरुन अपघात झाला आहे. या अपघातात जवळपास ३६ जणांचा मृत्यू झाला असून अनेकजण जखमी झाले आहेत.
 
डोडा जिल्ह्यातील असार भागात बुधवारी हा अपघात घडला आहे. किश्तवाडहून जम्मूला जाणारी बस रस्त्यावरुन घसरून ३०० फुट खड्ड्यात पडली आणि अपघात घडला आहे. दरम्यान, घटनास्थळी पोलिस दाखल झाले असून मदत आणि बचावकार्य सुरु आहे.
 

बस ओव्हरलोड होऊन बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त केले आहे. तसेच पंतप्रधान राष्ट्रीय मदतनिधीतून मृताच्या कुटुंबियांना २ लाख रुपये तर जखमींना ५० हजार रुपये देणार असल्याचे सांगितले आहे.


आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.