मुंबई : हिंदी चित्रपटसृष्टीत सध्या विविध विषयांवर भाष्य केले जाणारे चित्रपट येत असले तरी बायोपिककडे सध्या अधिक कल दिसून येत आहे. १९७१ मध्ये बांगलादेश मुक्तीसाठी झालेल्या संग्रामात पाकिस्तानला गुडघे टेकण्यास भाग पाडायला लावणारे भारतीय सैन्याचे पहिले फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांच्या जीवनावर आधारित चरित्रपट सॅम बहादुर रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. या चित्रपटातील पहिले गाणे बढते चलो हे दिवाळीच्या शुभ मुहुर्तावर भेटीला आले असून यात छत्रपती शिवाजी महाराज यांना मानवंदना देण्यात आली आहे.
अभिनेता विकी कौशल या चित्रपटात सॅम माणेकशॉ यांची व्यक्तिरेखा साकारत आहे. याच चित्रपटातील बढते चलो या गाण्यात भारतीय जवान शिवरायांचा जयघोष करताना दिसत असून जवान युद्धासाठी सज्ज असुन फील्ड मार्शल सॅम माणेकशॉ त्यांना मार्गदर्शन करताना दिसत आहेत.
मेघना गुलझार यांचे दिग्दर्शन असलेला सॅम बहादुर १ डिसेंबरला प्रदर्शित होणार असून चित्रपटात विकी कौशल सोबत सान्या मल्होत्रा, फातिमा साना शेख हे कलाकार झळकणार आहेत.