चीनला मोठा झटका! भारत आणि अफगाणिस्ताननंतर नेपाळमध्येही 'टिकटॉक' वर बंदी

    13-Nov-2023
Total Views |

TikTok


मुंबई :
भारत आणि अफगाणिस्ताननंतर आता नेपाळ सरकारनेही चिनी शॉर्ट व्हिडिओ ॲप 'टिकटॉक' (TikTok) वर बंदी आणली आहे. टिकटॉक अॅप नेपाळमधील सामाजिक ऐक्य आणि सौहार्दाला हानी पोहोचवत असल्याचे नेपाळ सरकारने म्हटले आहे.
 
सोमवार १३ नोव्हेंबर रोजी झालेल्या नेपाळ सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. गेल्या काही काळापासून नेपाळमध्ये आपला प्रभाव वाढवण्याचा प्रयत्न चीनकडून करण्यात येत आहे. त्यामुळे नेपाळ सरकारचे हे पाऊल चीनसाठी मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे.
 
देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे पण टिकटॉकमुळे त्यांच्या सामाजिक जडणघडणीला धक्का बसला असल्याचे नेपाळ सरकारचे म्हणणे आहे. गेल्या चार वर्षांत नेपाळमध्ये टिकटॉकवर १६२९ सायबर गुन्ह्यांची नोंद झाली आहे. नेपाळमध्ये सध्या २२ लाख टिकटॉक वापरकर्ते आहेत.
 
तसेच नेपाळमध्ये टिकटॉकवर जुगार आणि सट्टेबाजी देखील केली जात असल्याचे उघड झाले आहे. टिकटॉकवरील वाढत्या असभ्यतेमुळे नेपाळमधील अनेक धार्मिक आणि सांस्कृतिक स्थळांवर टिकटॉक व्हिडिओ बनवण्यावर बंदी घालण्यात आली आहे. या ठिकाणी ‘नो टिकटॉक’चे फलक लावण्यात आले आहेत. समाजात असभ्यता आणि सामाजिक समस्या निर्माण करण्यासोबतच टिकटॉकवर हेरगिरीचेही आरोप आहेत.आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.