मी टी राजा सिंहची हत्या करेन! असदुद्दीन ओवेसीसमोरच महिलेची धमकी

13 Nov 2023 14:55:07

T Raja Singh


हैद्राबाद :
तेलंगणातील निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांकडून जोरदार प्रचार करण्यात येत आहे. परंतू, प्रचारादरम्यानचा एक धक्कादायक व्हिडीओ पुढे आला आहे. एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी प्रचार करत असताना एका महिलेने भाजप नेते टी राजा सिंह यांची हत्या करणार असल्याचे म्हटले आहे.
 
तेलंगणात ३० नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुका पार पडणार आहेत. असदुद्दीन ओवेसी निवडणूकीच्या प्रचारासाठी गेले असता तेथील एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यामध्ये एक महिला असदुद्दीन ओवेसी यांना दुश्मनांना संपवून टाक. मुस्लिमांचे आशिर्वाद तुझ्या पाठीशी आहे, असे म्हणताना दिसत आहे.
 
तसेच पुढे ती म्हणाली की, मला त्या टी राजा सिंहच्या मतदारसंघातून उभे करा. मी त्याची हत्या करुन टाकेन, असे तिने म्हटले आहे. मात्र, यावर असदुद्दीन ओवेसी हे महिलेला काहीच बोलताना दिसत नाही. दरम्यान, भाजपने टी राजा सिंह यांचे निलंबन मागे घेत त्यांना गोशमहल, हैदराबाद येथून उमेदवारी दिली आहे.



Powered By Sangraha 9.0