'टायगर ३' बघताना चित्रपटगृहात उडवले फटाके, सलमानने टोचले चाहत्यांचे कान

    13-Nov-2023
Total Views |

tiger 3 
 
मुंबई : बहुचर्चित सलमान खानचा चित्रपट 'टायगर ३' दिवाळीच्या निमित्ताने देशभरात प्रदर्शित झाला. १२ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांनी भरघोस प्रतिसाद दिला. गेल्या काही काळापासून सलमानच्या चित्रपटांना यश मिळत नव्हते. मात्र, टायगर ३ चित्रपटाने तो रेकॉर्ड मोडित काढला आहे. मात्र, मालेगावमधील चित्रपटगृहात थेट काही टवाळखोरांनी फटाक्यांची जोरदार आतषबाजी केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. घडलेल्या या घटनेबद्दल सलमान खान याने ट्विट केले असून त्याने प्रेक्षकांची कानउघाडणी देखील केली आहे.
 
नेमके प्रकरण काय?
 
१२ नोव्हेंबर रोजी सलमान खान आणि कतरिना कैफ यांची प्रमुख भूमिका असलेला टायगर ३ चित्रपट प्रदर्शित झाला. बऱ्याच दिवसांनी सलमानचा चित्रपट आल्यामुळे आणि या आधी देखील टागर चित्रपटाचे २ भाग सुपरहिट ठरल्यामुळे प्रेक्षक तिसऱ्या भागासाठी उत्सुक होतेच. मात्र, चाहत्यांमध्ये असलेल्या उत्साहाचे रुपांतर एका जीवघेण्या घटनेत झाले. मालेगावमधील एका चित्रपटगृहात काही जणांनी थेट फटाकेच फोडले. काही अतिउत्साही चाहत्यांनी चित्रपटगृहात सुतळी बॉम्ब आणि इतर फटाके फोडले. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे इतर प्रेक्षकांचा गोंधळ उडाला आणि लोकं सैरावैरा पळू लागले.
 
 
 
काय म्हणाला सलमान खान?
 
घडलेल्या या धक्कादायक घटनेवर थेट सलमान खान याने ट्विट करत चाहत्यांची कानउघाडणी केली आहे. तो म्हणाला की, मी चित्रपटगृहात टायगर ३ चित्रपट सुरु असताना फटाके फोडल्याची घडना ऐकली. ही अतिशय जीवघेणी बाब आहे. त्यामुळे स्वत:च्या आणि दुसऱ्याच्या जीवाशी न खेळता चित्रपटाचा आनंद लुटुयात”, असे ट्विट करत सलमानने सौम्य शब्दांत चाहत्यांना सुनावले आहे.
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.