पुणेकरांनो सावधान! ऐन दिवाळीत संकट घोंघावतय

    13-Nov-2023
Total Views |

Pune 
 
 
पुणे : ऐन दिवाळीत लक्ष्मीपूजनानंतर जवळपास २५ हून अधिक आगीच्या घटना पुण्यातुन समोर आल्या आहेत. या घटनांमध्ये बरेच नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मात्र, सुदैवाने कोणीही जखमी झाले नसल्याची माहिती अग्निशामक दलाने दिली. या सर्व घटना फटाक्यांमुळे घडल्याची माहिती पुण्याच्या अग्निशामक दलाच्या प्रमुखांनी दिली आहे. त्यामुळे इथून पुढे दोन दिवस फटाके वाजवताना पुणेकर आणि नेमकी काय काळजी घ्यावी याबाबतचा अहवाल देखील त्यांनी तयार केलेला आहे.
 
नागरिकांच्या निष्काळजीपणामुळे या आगीच्या घटना घडल्या. अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षात रात्री साडेसात वाजल्यानंतर रात्री दहा वाजेपर्यंत आगीच्या १६ घटनांची नोंद झाली. शुक्रवार पेठेत पोलिस चौकीसमोर नऊ वाजण्याच्या सुमारास जुन्या वाड्याला आग लागली. या वाड्यात कोणी राहत नव्हते. वाघोली-बायफ रस्त्यावरील ब्ल्यू स्काय सोसायटीच्या दहामजली इमारतीमधील एका सदनिकेत आग लागली. पीएमआरडीए अग्निशामक दलाच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली.
 
 
फटाके फोडताना काय खबरदारी घ्याल?
 
  • पालकांच्या देखरेखीखाली फक्त हिरवे फटाके फोडा.
  • डोळ्यांचे संरक्षण करण्यासाठी संरक्षक चष्मा घाला.
  • फटाके वाजवताना सिंथेटिक आणि नायलॉन ऐवजी जाड सुती आणि घट्ट कपडे घाला.
  • फटाके पेटवताना आग लागली आणि ती वाढत असेल तर वाळू टाकून ती विझवा.
  • हातात फटाके घेऊन आग लावू नका. दुरूनच विस्तवा पेटवा, फटाके पेटवताना चेहरा त्यावर ठेवू नका.
  • डोळ्यात कोणतीही समस्या किंवा अंधुक दिसल्यास ताबडतोब नेत्ररोग तज्ञाचा सल्ला घ्या.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.