मुंबई : यंदा दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर भारतीयांनी मोठी खरेदी केली आहे. सणासुदीच्या हंगामातील विक्रीमुळे ईकॉमर्स कंपन्यांना आणि ऑनलाइन ब्रँडच्या विक्रीत विक्रमी वाढ झाली आहे. ज्यात इलेक्ट्रॉनिक्स, खाद्यपदार्थ, किराणा आणि दागिने यासारख्या श्रेणींनी गेल्या वर्षीच्या तुलनेत दुप्पट वाढ नोंदवली आहे.
एका अहवालानुसार, अन्न आणि किराणा, ग्राहकोपयोगी वस्तू आणि दागिने यासारख्या विभागांमध्ये वर्षभरात डिजिटल व्यवहारांमध्ये ५० टक्क्यांनी वाढ झाली आहे. दिवाळी हा सण संपूर्ण भारतात साजरा केला जातो. दिवाळीच्या आधी साजऱ्या केल्या जाणाऱ्या धनत्रयोदशी दिवशी हिंदू परंपरानुसार नवीन वस्तू खरेदी करण्यासाठी चांगला मुहूर्त मानण्यात येतो.
दिवाळीनिमित्त भारतीय कपड्यांची त्यासोबतच फराळांची आणि इॅलेक्ट्रानिक वस्तूंची पण मोठ्या प्रमाणावर खरेदी केली जाते. भारतात मागच्या काही वर्षात ग्राहकांचा कल ऑनलाईन विक्रीकडे वाढला आहे. भारतात ऑनलाईन विक्रीमध्ये अॅमेझान आणि फ्लिपकार्टमध्ये आघाडीवर आहे.