तिरुवनंतपुरम : केरळ पोलिसांनी १० दिवसांच्या निष्पाप बाळाची हत्या केल्याप्रकरणी आसाममधून दोघांना अटक केली आहे. मक्सिदुल इस्लाम आणि मुशिदा खातून अशी आरोपींची नावे आहेत. आरोपींनी गळा दाबून बाळाची हत्या केली आणि प्लॅस्टिकच्या पिशवीत मृतदेह गुंडाळून फेकून दिला होता.
मिळालेल्या माहितीनुसार, ८ ऑक्टोबर रोजी रोजी मुदिक्कल येथील एका नदीजवळ प्लॅस्लिकच्या पिशवीत जवळपास दहा दिवसांच्या मुलीचा मृतदेह सापडला होता. लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये असलेल्या आरोपी जोडप्याने या निष्पाप मुलीचा गळा दाबून ह्त्या केली असल्याचे सांगण्यात येत आहे.
ते दोघेही आईवडील बनण्याच्या तयारीत नसल्याने त्यांनी हे कृत्य केल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे त्यांनी मुलीचा गळा दाबून तिची हत्या केली. एवढेच नाही तर मृतदेह प्लॅस्टिकच्या पिशवित गुंडाळून फेकून दिला. त्यानंतर ते दोघेही आसामला पळून गेले. दरम्यान, आता केरळच्या पेरुंबवूर पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे. याप्रकरणी पुढील कारवाई सुरु आहे.