लग्नाचे आमिष दाखवत तब्बल एक वर्ष बलात्कार! आरोपी अर्शदला अटक

12 Nov 2023 15:59:21

Rape case

 
लखनऊ : उत्तर प्रदेशातून एक धक्कादायक बातमी पुढे आली आहे. लग्न करण्याच्या बहाण्याने येथील एका दलित मुलीवर तब्बल एक वर्ष बलात्कार करण्यात आला आहे. दरम्यान, याप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे.
 
हे प्रकरण अमरोहा जिल्ह्यातील डिडोली पोलीस स्टेशन परिसरातील असून अर्शद असे आरोपीचे नाव आहे. अर्शद गेल्या एक वर्षापासून लग्नाच्या बहाण्याने पीडितेवर बलात्कार करत होता. दरम्यान, ३ ऑक्टोबर रोजी आरोपी पीडितेला मुबारकपूर भागात असलेल्या ओयो हॉटोलमध्ये घेऊन गेला.
 
त्यानंतर तिथे त्याने तिच्यावर बलात्कार केला. पीडितेने याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. पीडित तरुणी स्थानिक महाविद्यालयात बीएससी तिसर्‍या सेमिस्टरची विद्यार्थिनी आहे. दरम्यान, पोलिसांनी १० नोव्हेंबर रोजी अर्शदला अटक केली असून याप्रकरणाचा तपास सुरु आहे.



Powered By Sangraha 9.0