मुंबई : भाजप मागाठाणे विधानसभा आणि वीर सावरकर रहिवाशी यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार १२ नोव्हेंबर २०२३ रोजी पाटीदार समाज हॉल, वीर सावरकर नगर, बोरिवली पूर्व येथे पहाटे ५ वा. स्वप्नील पंडित प्रस्तुत 'दिवाळी पहाट मेघ मल्हार' कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला उत्तर मुंबईचे खासदार गोपाळ शेट्टी आणि भाजपा विधानपरिषद गटनेते आमदार प्रविण दरेकर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
या कार्यक्रमात ई टिव्ही, सह्याद्री फेम गायिका स्वराली पांचाळ, झी टीव्ही फेम दीप्ती रेगे, झी टीव्ही फेम गायक जयंत पिंगुळकर, आंतरराष्ट्रीय कलाकार सायना ओव्हळ यांच्या मराठी व हिंदी गीतांचा सुरेल नजराणा सादर करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला ज्येष्ठ अभिनेते, पद्मश्री पुरस्कार सन्मानित मनोज जोशी, अभिनेते स्वप्नील जोशी, अभिनेते जयंत वाडकर, प्रसाद खांडेकर, संगीतकार अवधूत गुप्ते, संगीतकार प्रसाद बर्वे, अभिनेत्री श्रेया बुगडे, स्वाती देवल, निशा परुळेकर, माधवी जुवेकर यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे. कार्यक्रमाचे निवेदन संतोष जाधव करणार आहेत, अशी माहिती भाजपा उपाध्यक्ष प्रकाश दरेकर यांनी दिली.