मुंबई उच्च न्यायालयांतर्गत विविध पदांवर चौथी पास उमेदवारांना नोकरीची संधी!

    01-Nov-2023
Total Views |
bombay high court Nagpur Bench Recruitment 2023

मुंबई :
मुंबई उच्च न्यायालय, नागपूर खंडपीठांतर्गत नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. या भरतीच्या माध्यमातून चौथी उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी मिळणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या 'कुक', 'माळी' या पदांकरिता अर्ज मागविण्यात येत आहेत. भरतीसंदर्भात अधिक तपशील जाणून घेण्यासाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

मुंबई उच्च न्यायालयांतर्गत विविध पदांकरिता चौथी पास उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. तसेच, सदर भरतीकरिता अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज करण्याची शेवटची तारीख २२ नोव्हेंबर २०२३ असणार आहे.

तर, मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत होणाऱ्या भरतीसाठी अर्जदाराने आपला अर्ज हा रजिस्ट्रार (प्रशासन), मुंबई उच्च न्यायालय, नागपूर खंडपीठ, सिव्हिल लाइन्स, नागपूर – ४००००१, या पत्त्यावर पाठवायचा आहे.

दरम्यान, पदांच्या आवश्यकतेनुसार शैक्षणिक पात्रता निश्चित करण्यात आली असून वरील रिक्त पदांसाठी पदनिहाय शैक्षणिक पात्रता वेगवेगळी आहे. सहाय्यक ग्रंथपाल पदासाठी पदवी आणि कुक, माळी पदांसाठी चौथी पास उमेदवार अर्ज करू शकतात.