मराठा आरक्षण : शहाजी बापू पाटलांचा ताफा अडवला!

01 Nov 2023 17:52:35

Shahaji Bapu Patil

पंढरपूर :
मराठा आरक्षणाच्या मुद्दयावरुन राज्यभरात वातावरण पेटलेले असून आंदोलक चांगलेच आक्रमक झाले आहेत. आंदोलकांकडून वेगवेगळ्या भागांत तोडफोड करण्यात येत आहे. यातच आता आंदोलकांनी शिवसेनेचे आमदार शहाजी बापू पाटील यांची गाडी अडवली आहे.
 
पंढरपूरच्या कराड नाक्यावर मराठा आंदोलकांनी शहाजी बापू पाटलांची गाडी अडवली आहे. आंदोलकांकडून वाहनचालकाने अंगावर गाडी घातल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्यामुळे त्यांनी गाडी अडवत वाहनचालकाला शिवीगाळ केली. त्यानंतर शहाजी बापू पाटील यांनी गाडीतून खाली उतरत आंदोलकांची माफी मागितली.



Powered By Sangraha 9.0