सकाळी कुणबी दाखल्यांचं वाटप, संध्याकाळी होळी!

01 Nov 2023 18:00:28
 
Kunbi Certificate
 
 
धाराशिव : कुणबी दाखल्यांचं वाटप धाराशिव येथे करण्यात आलं. धाराशिवचे जिल्हाधिकारी सचिन ओम्बासे यांच्याकडून कुणबी प्रमाणपत्र वाटप करण्यात आलं होतं. हे प्रमाणपत्र लाभार्थींनी जाळले आहेत. मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीनुसार ज्यांच्याकडे कुणबी जातीच्या नोंदी असतील त्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय सरकारने घेतला होता.
 
शिंदे समितीच्या अहवालनंतर धाराशिव, मराठवाड्यातील पहिले प्रमाणपत्र देण्यात आले होते. धाराशिव तालुक्यातील कारी या गावातील सुमित भारत माने या पात्र लाभार्थीला जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले. सुमित माने या लाभार्थीचे पंजोबा कृष्णा दादा माने यांचे गाव नमुना १४ वरील १९१७ चा कुणबी असल्याचा पुरावा सापडल्यानंतर या मराठा असणाऱ्या सुमित मानेला कुणबी दाखला मिळाला आहे.
 
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0