"टीकणारं आरक्षण दाखवा... मी राजीनामा देतो...", जितेंद्र आव्हाडांचं वक्तव्यं!
01 Nov 2023 17:23:43
मुंबई : "टिकणारं आरक्षण दाखवा, मी राजीनामा देतो," असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे. मराठा आरक्षणप्रश्नी १ नोव्हेंबर रोजी सर्वपक्षीय बैठक आयोजित करण्यात आली होती. यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
यावेळी बोलताना ते म्हणाले की, "मला घटनात्मक तरतुदी दाखवा. माझं चॅलेंज आहे टिकणारं आरक्षण द्या. आम्ही जबाबदार असल्यास मी राजीनामा द्यायला तयार आहे. मी छोटा राजीनामा देणार नाही, तर मी स्वत: डायरेक्ट राज्यपालांकडे जाऊन राजीनामा देणार," असे त्यांनी म्हटले आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हायकोर्टात टिकणारे आरक्षण दिले होते. परंतू, महाविकास आघाडीचे सरकार ते सुप्रीम कोर्टात टिकवू शकले नाही, असे वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केले होते. याविषयी विचारले असता जितेंद्र आव्हाड बोलत होते. दरम्यान, राज्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न प्रचंड तापला असून मराठा समाज आक्रमक झाला आहे.