तेल अवीव : इस्रायल आणि हमास यांच्यात ७ ऑक्टोबरपासून युद्ध सुरू आहे. मंगळवारी, युद्धाच्या २६ व्या दिवशी, इस्रायली सैन्याने गाझामधील सर्वात मोठ्या जबलिया निर्वासित छावणीवर हल्ला केला. या हल्ल्यात हमासचा वरिष्ठ कमांडर इब्राहिम बियारीसह ५० दहशतवादी मारले गेले. गाझाच्या आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, जबलिया शरणार्थी शिबिर सुमारे १.४ चौरस किमी परिसरात पसरले आहे.
इस्रायली लष्कराच्या हल्ल्यात ५० दहशतवाद्यांचा खात्मा झाला आहे, तर १५० हून अधिक लोक गंभीर जखमी झाले आहेत. इस्रायल डिफेन्स फोर्सेस (आयडीएफ) ने एका निवेदनात म्हटले आहे की, गाझाच्या सर्वात मोठ्या निर्वासित छावणी जबलियावर लढाऊ विमानांनी केलेल्या हल्ल्यात हमास कमांडर इब्राहिम बियारी मारला गेला आहे.
हमासने इस्रायलच्या हल्ल्याचा निषेध केला आहे. त्यासोबतच निर्वासित छावणी कमांडर इब्राहिम बियारीच्या मृत्यूचे खंडन केले आहे. हमासने दावा केला आहे की जबलिया येथे ४०० लोक मारले गेले आहेत. हमाचने जो मृत्यूचा आकडा सांगितला आहे. त्याची स्वतंत्रपणे खात्री करता येत नाही.