मुंबई : दिवाळी, छटपूजा आणि यानंतर सुरु होणाऱ्या सणासुदीच्या दिवसात अनेक चाकरमान्यांसह पर्यटक सुट्टीचा आनंद घेण्यासाठी बाहेरगावी जातात. या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने विशेष गाड्यांच्या फेऱ्यांमध्ये वाढ केली असून एकूण ७० अधिक फेऱ्यांमध्ये गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी रेल्वेने घेतलेला हा निर्णय महत्त्वपूर्ण आहे. यात वलसाड-दानापूर साप्ताहिक विशेष (१६ फेऱ्या), उधना-मंगळुरु जंक्शन द्वि-साप्ताहिक विशेष ( ३६ फेऱ्या) , इंदूर-पुणे साप्ताहिक विशेष (१८ फेऱ्या) या गाड्यांच्या सेवांमध्ये वाढ केली आहे.
वलसाड-दानापूर साप्ताहिक विशेष (०९०२५) ६ नोव्हेंबर ते २५ डिसेंबर दरम्यान वलसाड येथून दर सोमवारी ०८:४० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी ११:३० वाजता दानापूरला पोहोचेल. तर परतीच्या प्रवासाची (०९०२६) विशेष ७.११.२०२३ ते २६.१२.२०२३ पर्यंत दर मंगळवारी १४:३० वाजता दानापूरहून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी २१:३० वाजता वलसाडला पोहचेल. ही रेल्वे वलसाड, भेस्तान, नंदुरबार, भुसावळ, खंडवा, इटारसी, जबलपूर, कटनी, सतना, माणिकपूर, प्रयागराज छेओकी, पं. दीनदयाल उपाध्याय जंक्शन, बक्सर, आरा आणि दानापूर या स्थानकांदरम्यान थांबेल.
उधना-मंगळुरु जंक्शन द्वि-साप्ताहिक विशेष (०९०५७) स्पेशल ३ नोव्हेंबर ते ३१ डिसेंबर दरम्यान दर शुक्रवारी आणि रविवारी १९:४५ वाजता उधना येथून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी १९:१० वाजता मंगळुरू जंक्शनला पोहोचेल. तर परतीकरता (०९०५८) मंगळुरु जंक्शनहून दर शनिवारी आणि सोमवारी २१:१० वाजता ४ नोव्हेंबर ते १ जानेवारी दरम्यान सुटेल आणि दुसऱ्या दिवशी २१:३० वाजता उधना येथे पोहचेल. ही विशेष ट्रेन उधना, वलसाड, वापी, पालघर, वसईरोड, भिवंडी रोड, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी, थिविम रोड , मडगाव जंक्शन, कानाकोना, कारवार, अंकोला, गोकर्ण रोड, कुमटा, मुर्डेश्वर, भटकळ, मुकंबिका रोड ब्यंदूर, कुंदापुरा, उडुपी, मुल्की, सुर्थकल आणि मंगळुरू येथे थांबेल.
इंदूर-पुणे साप्ताहिक विशेष (०९३२४) १ नोव्हेंबर ते २७ डिसेंबर दरम्यान इंदूरहून दर बुधवारी ११:१५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी ०३:१० वाजता पुण्याला पोहोचेल. (०९३२३) स्पेशल २ नोव्हेंबर ते २ जानेवारी दरम्यान पुण्याहून दर गुरुवारी ०५.१० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी २३:५५ वाजता इंदूरला पोहचेल. ही विशेष ट्रेन इंदूर, देवास, उज्जैन, नागदा, रतलाम, गोध्रा, वडोदरा, सुरत, वलसाड, वापी, वसई रोड, कल्याण, लोणावळा आणि पुणे येथे थांबेल.