मुलुंडमध्ये रंगणार दिवाळी पहाट!

01 Nov 2023 18:38:28

Prakash Gangadhare

मुंबई :
मुलुंड सेवा संघच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त सप्तसुरांची संगीतमय व प्रकाशमय दिवाळी पहाट आयोजित करण्यात आली आहे. यानिमित्त धुंद निर्मित, मराठी वाद्यवृंद 'स्वरतरंग' या कार्यक्रमाचे आयोजन रविवार, दि. १२ नोव्हेंबर रोजी सकाळी ६.३० वाजता मुलुंड पश्चिमेकडील कालिदास नाट्यमंदिर येथे करण्यात आले आहे.
 
मुलुंड सेवा संघचे अध्यक्ष तथा माजी नगरसेवक प्रकाश गंगाधरे यांनी ही माहिती दिली आहे. कार्यक्रमाचे निवेदन अनघा मोडक करणार असून निमंत्रक सुशांत बर्वे आहेत. मोफत प्रवेशिकांसाठी माजी नगरसेवक प्रकाश गंगाधरे यांच्या मुलुंड पश्चिमेतील श्री सोसायटी, गणेश गावडे रोड येथील जनसंपर्क कार्यालय किंवा गवाणपाडा येथील मुलुंड सेवा संघच्या कार्यालयात संपर्क साधण्याचे आवाहन आयोजक प्रकाश गंगाधरे यांनी केले आहे.

Powered By Sangraha 9.0