मुंबई : 'सेंट्रल बँक ऑफ इंडिया'अंतर्गत काम करण्याची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडियाकडून यासंदर्भात अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या नोकरीची संधी घेण्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
'सेंट्रल बँक ऑफ इंडिया'अंतर्गत विविध पदांच्या एकूण १९ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. तसेच, सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या अधिसूचनेनुसार, या रिक्त जागांसाठी दि. २८ ऑक्टोबर २०२३ पासून अर्जस्वीकृती सुरू करण्यात आली आहे. तसेच, अर्जदारास अर्ज करण्यासाठी अंतिम मुदत दि. १९ नोव्हेंबर २०२३ असणार आहे. या अंतिम मुदतीपूर्वी अर्ज करावयचा आहे.
या भरतीकरिता उमेदवारांसाठी वयोमर्यादा निश्चित करण्यात आली असून पदांच्या आवश्यकतेनुसार निश्चित करण्यात आली आहे. दरम्यान, या भरतीकरिता परीक्षांच्या संभाव्य तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यानुसार, परीक्षा या डिसेंबर महिन्याच्या ३ किंवा ४ आठवड्यात घेण्यात येऊ शकते. भरतीसंदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी
अधिकृत वेबसाईटला भेट द्या.