मुंबई : मालाड मालवणी मतदारसंघाचे आमदार अस्लम शेख यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. अस्लम शेख यांना ५ ऑक्टोबर रोजी सकाळी साडेदहा वाजता मोबाईलवर एका अज्ञान नंबरवरुन कॉल आला. तो फोन अस्लम शेख यांचे पीए विक्रम कपूर यांनी उचलला. त्यावेळी पुढील दोन दिवसांत आमदार अस्लम शेख यांना जीवे मारण्यात येईल अशी धमकी देण्यात आली.
फोन झाल्यानंतर विक्रम कपूर यांनी तात्काळ बांगूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तर पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हा फोन कॅनडामधून आला असल्याची माहिती देण्यात आली आहे. पोलीस या प्रकरणात अधिक तपास करत आहेत. 'मी गोल्डी ब्रार बोलत आहे. मी अस्लम शेखला दोन दिवसांत गोळ्या घालणार आहे. हे त्याला सांगा.' असे फोनवरुन सांगण्यात आले.