प्रकाश महाजन लोकसभा लढवणार का? म्हणाले, "राज ठाकरे...."

07 Oct 2023 12:21:31

Prakash Mahajan 
 
 
मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी मनसेने जोरदार तयारी सुरू केली आहे. आगामी सर्व निवडणुका लढवणार असल्याची घोषणा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी केली होती. त्यानुसार पक्षाच्या वतीने मोर्चेबांधणीलाही सुरुवात करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेच्या संभाव्य उमेदवारांची यादीही तयार करण्यात आली आहे. या यादीत एकूण दहा नावांचा समावेश आहे.
 
 
मनसेची संभाव्य उमेदवारांची यादी आणि मतदार संघ
 
 
  • कल्याण लोकसभा – राजू पाटील
  • ठाणे लोकसभा – अभिजित पानसे/ अविनाश जाधव
  • पुणे लोकसभा – वसंतराव मोरे
  • उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा- शालिनीताई ठाकरे
  • दक्षिण मुंबई लोकसभा- बाळा नांदगावकर
  • संभाजीनगर लोकसभा – प्रकाश महाजन
  • सोलापूर लोकसभा – दिलीप धोत्रे
  • चंद्रपूर लोकसभा – राजू उंबरकर
  • रायगड लोकसभा – वैभव खेडेकर
 
 
या यादीवर मनसेच्या वतीने अधिकृत घोषणा करण्यात आली नाही. मात्र, ज्या नावांची चर्चा सुरू आहे, त्याच नावांचा समावेश या यादीत करण्यात आला आहे. यावर, प्रकाश महाजन यांना विचारले असता ते म्हणाले, "राज ठाकरे घेतील तो अंतिम निर्णय असेल."
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0