भारत इस्रायलच्या पाठीशी – पंतप्रधान नरेंद्र मोदी

07 Oct 2023 22:30:56
PM Modi's message to Israel

नवी दिल्ली
: पॅलेस्टिनी अतिरेकी संघटना हमासने शनिवारी इस्रायलवर केलेल्या रॉकेट हल्ल्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निषेध केला आहे. हा दहशतवादी हल्ला असून भारत निष्पाप पिडीतांच्या पाठीशी असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
 
पॅलेस्टिनी अतिरेकी संघटना हमासने इस्रायसवर केलेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये शेकडो निष्पाप इस्रायली नागरिकांचा बळी गेला आहे. या हल्ल्यानंतर इस्रायलनेही जोरदार प्रत्युत्तर देण्यास प्रारंभ केला आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या हल्ल्याचा निषेध केला आहे. ‘एक्स’ या समाजमाध्यमावर पंतप्रधान मोदी म्हणाले की, इस्रायलमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या वृत्ताने खूप धक्का बसला. आमच्या प्रार्थना निष्पाप पीडित आणि त्यांच्या कुटुंबियांसोबत आहेत. या कठीण प्रसंगी आम्ही इस्रायलच्या पाठीशी उभे आहोत, असे पंतप्रधान मोदी म्हणाले आहेत.
 
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांनी इस्रायलवर झालेल्या हल्ल्यास तीव्र प्रत्युत्तर देण्यास प्रारंभ केला आहे. ते म्हणाले की, आम्ही सध्या युद्धाच्या स्थितीत आहोत. आमच्यावर हल्ला करणाऱ्या शत्रूस चोख प्रत्युत्तर देण्यात येणार असून शत्रूस त्यांनी विचारही केला नसेल, एवढी मोठी किंमत मोजावी लागेल; असे नेत्यान्याहू यांनी म्हटले आहे.





Powered By Sangraha 9.0