मुंबई : हांगझाऊ येथे सुरु असलेल्या १९ व्या आशियाई क्रीडास्पर्धेच्या समारोपाकडे जात असताना भारताची सुवर्णकामगिरी अद्याप सुरुच आहे. यात आणखी भर पडली ती भारतीय कबड्डी पुरुष संघाने इराणचा ३३-२९ असा पराभव करून सुवर्णपदक जिंकले. भारत विरुध्द इराण या रोमहर्षक लढतीत भारताकडून विजयी आघाडी घेत इराणचा पराभव केला. भारताकडून कप्तान पवन कुमार सेहरावत याच्या नेतृत्वात उतरलेल्या संघाने अचूक खेळी करत भारताला विजेतेपद मिळवून दिले आहे.
दरम्यान, भारतीय कबड्डी पुरुष संघ २०१८ मध्ये जकार्ता येथील क्रीडास्पर्धेत इराणकडून पराभव स्वीकारावा लागला होता. परंतु, यावेळेस गतविजेत्या इराण धोबीपछाड देत भारताने सुवर्णपदकावर आपली मोहर उमटविली आहे. या कामगिरीमुळे भारतीय कबड्डी संघाने पुन्हा एकदा आगामी स्पर्धेसाठी स्वतःला तयार केले आहे.