सिंधुदुर्गात आढळली जंपिंग स्पायडरची ‘ही’ नवी प्रजात

06 Oct 2023 13:15:15


jumping spider in sindhudurg


मुंबई (प्रतिनिधी): सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळमध्ये संशोधकांच्या तुकडीने जंपिंग स्पायडरच्या एका नव्या प्रजातीचा शोध लावला आहे. ऋषिकेश त्रिपाठी, गौतम कदम, आशा तेरेसा आणि अंबाल परम्बील सुधिकुमार यांनी एकत्रितपणे ही प्रजात शोधली असुन प्रतिष्ठीत झूटॅक्सा या आंतरराष्ट्रीय नियतकालीकामध्ये हा शोधप्रबंध प्रकाशित झाला आहे.


जंपिंग स्पायडरच्या नव्याने शोधलेल्या कोळ्याची प्रजात सिंधुदुर्गमध्ये आढळल्यामुळे ‘स्पारम्बाबस सिंधुदुर्ग’ असे या प्रजातीचे नाव ठेवण्यात आले आहे. केरळच्या क्राईस्त कॉलेजमधले संशोधक आणि सिंधुदुर्गतील संशोधक गौतम कदम यांनी या प्रजातीवरील संशोधन केले आहे.



jumping spider in sindhudurg

काय आहे विशेष बाबी?
या संशोधनाआधीच फेशिअस या प्रवर्गात ही प्रजात गणली जात होती. या पुर्वी चीन आणि मलेशियामधून या कोळ्याच्या प्रजातींची नोंद करण्यात आली होती. मात्र, बारकाईने केलेल्या निरिक्षणानंतर ही प्रजात स्पारम्बास असल्याचे ऋषिकेश त्रिपाठी आणि गौतम कदम यांच्या निदर्शनास आले. चीन आणि मलेशियामध्ये झालेल्या नोंदींनंतर ही भारतातली नव्या प्रजातीची पहिलीच नोंद आहे.

नव्याने शोधलेली कोळ्याची ही प्रजात झाडाच्या बुंध्यावर किंवा बांबुच्या गवतांवर मुख्यत्वे आढळते. नर आणि मादी हे वेगवेगळी शिकारीची ठिकाणे वापरत असुन ते गुप्तपणे शिकार करतात. या नवसंशोधित कोळ्याच्या प्रजातीमुळे पश्चिम घाटातील जैवविविधताच पुन्हा एकदा अधोरेखीत झाली आहे.



Powered By Sangraha 9.0