मुंबई : नांदेड, नागपूर, संभाजीनगर रुग्णालयातून मृतांची आकडेवारी सातत्याने वाढत आहे. या घटनेवर राजकीय वर्तुळातुन प्रतिक्रिया येत आहे. उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनीही पत्रकार परिषद घेत नांदेड प्रकरणावरुन सरकारवर ताशेरे ओढले आहेत. कोविड काळात आपण औषधं कानाकोपऱ्यात पोहोचवली. असं ठाकरे म्हणाले आहेत. कमी मनुष्यबळ असतानाही आम्ही कोरोनाचा सामना केला. मी मुख्यमंत्री असताना सर्वोच्च मुख्यमंत्री म्हणून माझं नाव येत होतं. असं ठाकरेंनी पत्रकार परिषदेत म्हटलं आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले, "आताच्या सरकारने आरोग्य यंत्रणेचे तीन - तेरा वाजले आहेत. याच आरोग्य यंत्रणेने कोरोना काळात उत्तम काम केलं होतं. कोरोना काळात डॉक्टर नर्स एका योद्ध्याप्रमाणे लढले पण आता त्यांना बदनाम केलं जात आहे. कोरोना काळात औषधांची कमतरता भासली नाही. आपण औषधं कानाकोपऱ्यात पोहोचवली. दुर्दैवी घडत आहे. मुख्यमंत्री कुठे आहेत? मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी नांदेडला जायला हवं होतं. राज्यातील सरकारमध्ये दलाल बसले आहेत. सध्या जी साथ आहे ती भ्रष्टाचाराची साथ आहे. सरकारची सीबीआय चौकशी झाली पाहिजे." असं उद्धव ठाकरे म्हणाले.