शेअर मार्केट अपडेट्स: पुन्हा एकदा मार्केटमध्ये ' बूम' अप्पर ट्रेंडची प्रतिक्षा संपली.

06 Oct 2023 18:24:16

Stock
 
 
शेअर मार्केट अपडेट्स: पुन्हा एकदा मार्केटमध्ये ' बूम' अप्पर ट्रेंडची प्रतिक्षा संपली.
 

निफ्टी १९६५० व सेन्सेक्स ६५९९० वर. निफ्टीत तब्बल १४० पूर्णांकांने वाढ
 

मुंबई: आज रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांता दास यांनी आरबीआयचे आर्थिक पतधोरण जाहीर केले आहे. त्यामुळे मार्केट मध्ये मोठ्या प्रमाणात उत्साहाचे वातावरण पहायला मिळाले. सलग चौथ्यांदा रेपो रेट स्थिर ठेवल्याने उद्योगधंद्यांसाठी अनुकूलता असल्याची चर्चा उद्योग वर्तृळात रंगली आहे. रेपो रेट ६.५ टक्के स्थिर ठेवल्याने आर्थिक वर्ष २३ मधील जून तिमाहीत विकासदर ६.५ टक्यांने राहण्याची शक्यता देखील आरबीआयने वर्तवली आहे ‌. विशेषतः महागाई दबावातही भारताने आपली अर्थव्यवस्था बळकट केल्याचे दिसून आले. भाज्या, क्रुड, इंधन दरवाढीने जागतिक स्तरावरील संकटातही भारतातील रूपये मूल्य घसरले वगळता विकासदरात कुठलीही घट पहायला मिळाली नाही.
 
 
सकाळी ओपनिंग बेलनंतर शेअर बाजारात सेन्सेक्स ३२४ पूर्णांकांने वाढून ६५९५५ पर्यंत व निफ्टी १९६०० वर स्थिर पहायला मिळाला. दिवसा अखेर निफ्टीत थेट १४० पूर्णांकांने वाढ झाली. विशेषतः रियल्टी सेक्टर शेअर्स मध्ये भरघोस वाढ पहायला मिळाली. या अनुषंगाने सेन्सेक्स मध्येही २६३ गुणांनी वाढ होऊन सेन्सेक्स इंडेक्स ४४३६० पर्यंत पोहोचला.
 
 
आज टॉप गेनर कंपन्या मध्ये बजाज फायनान्स, टायटन कंपनीचे शेअर्स तेजीत पहायला मिळाले दुसरीकडे हिंदुस्थान युनिलिव्हर, ओनजीसी , कोल इंडिया या शेअर्स मध्ये घसरण पहावयास मिळाली.
 
Powered By Sangraha 9.0