Asian Games 2022 : भारतीय पुरुष हॉकी संघाला 'सुवर्ण'यश, थेट 'पॅरिस ऑलिम्पिक'मध्ये प्रवेश

06 Oct 2023 18:05:28
Indian men's hockey team Won Gold Medal

नवी दिल्ली :
हांगझाऊ येथे सुरू असलेल्या आशियाई क्रीडास्पर्धेत भारताची देदीप्य कामगिरी राहिली असून आतापर्यंतची सर्वोत्तम पदकतालिका म्हणून गणली जात आहे. अशातच, भारतीय पुरुष हॉकी संघाने सुवर्णपदक जिंकले असून अंतिम सामन्यात जपानचा ५-१ ने पराभव केला. या विजयासह या विजयासह भारतीय संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला आहे.

दरम्यान, भारतीय हॉकी संघाने तब्बल नऊ वर्षांनंतर आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकत पॅरिस ऑलिम्पिकमध्ये प्रवेश मिळविला. याआधी भारताने २०१८ ला जकार्ता येथे कांस्यपदकावर समाधान मानावे लागले होते. तर चौथ्या आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्ण जिंकले तर, भारताची इतर सुवर्णपदके १९६६ आणि १९९८ मध्ये, दोन्ही वेळेस बँकॉक येथील आशियाई क्रीडास्पर्धेत मिळाले होते.

भारतीय संघाकडून खेळताना हरमनप्रीत सिंगने ३२ आणि ५९ व्या मिनिटाला गोल करत पेनल्टी कॉर्नरवर दोन गोल केले, अमित रोहिदास ३६ व्या मिनिटाला यानेही तर मनप्रीत सिंग २५ व्या मिनिटाला आणि अभिषेकने ४८ व्या मिनिटाला सहज खेळीद्वारे गोल करत सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. 



Powered By Sangraha 9.0