शरद पवार गट निवडणूक आयोगात आपली ताकद दाखवण्यात अपयशी!

06 Oct 2023 17:48:38
Sharad Pawar 
 
नवी दिल्ली : राष्ट्रवादी पक्ष कोणाचा यावर आज केंद्रीय निवडणूक आयोगाच्या दिल्ली कार्यालयात प्रत्यक्ष सुनावणी घेणार आहे. राष्ट्रवादीच्या दोन्ही गटासाठी ही सुनावणी महत्वपूर्ण ठरणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव आणि चिन्ह कोणत्या गटाला मिळणार हे निवडणूक आयोगाच्या सुनावणी नंतर स्पष्ट होईल.
 
सुनावणीच्या आधी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी शरद पवार गट आपली ताकद दाखवून देण्यात अपयशी ठरल्याची टीका केली. ते म्हणाले की, "दोन्ही गट आयोगात आपली बाजू मांडणार आहेत. आम्हाला खात्री आहे पक्षातील अधिक लोक आमच्यासोबत आहेत."
 
पुढे बोलताना ते म्हणाले की, "निवडणूक आयोगाने एप्रिल महिन्यात राष्ट्रवादी काँग्रेसची राष्ट्रीय मान्यता काढून घेतली होती. त्यामुळे नागालँड आणि महाराष्ट्र या दोन राज्यात आम्हाला मान्यता प्राप्त आहे. त्या अर्थाने नागालँडमधील ७ आमदार तर महाराष्ट्रातील ५३ पैकी ४३ आमदारांनी अजित पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास दर्शवला आहे. यामुळे बहुमत आमच्या बाजूने आहे."
 
Powered By Sangraha 9.0