‘किंगपीन’अद्याप बाहेर, मात्र लवकरच तुरुंगवारी घडणार

05 Oct 2023 18:13:11

anurag thakur

नवी दिल्ली :
दिल्ली मद्य घोटाळ्यातील किंगपीन अद्याप बाहेर आहे. मात्र, लवकरच किंगपीनलाही तुरुंगवारी घडणार आहे, असा टोला केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे नाव न घेता लगाविला आहे.

केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी गुरुवारी आम आदमी पक्षावर निशाणा साधला. त्यांनी आपचे संयोजक अरविंद केजरीवाल यांच्यावरही निशाणा साधला. ज्या लोकांना केजरीवाल यांनी प्रामाणिकपणाचे प्रमाणपत्र दिले ते तुरुंगात आहेत. देशातील लोक आता लोक अरविंद केजरीवाला यांच्यावर हसत आहेत. त्यांच्या चेहऱ्यावर प्रचंड ताण दिसून येतो.

मद्या घोटाळ्यातील किंगपीन अर्थात प्रमुख व्यक्ती अद्यापर्यंत तरी बाहेर आहे. मात्र, लवकरच किंगपीनदेखील तुरुंगात दिसेल असा टोला केंद्रीय मंत्री ठाकूर यांनी लगाविला आहे. दरम्यान, आप खासदार संजय सिंह यांच्या अटकेनंतर दिल्लीमध्ये आप कार्यकर्त्यांनी भाजपविरोधात निदर्शन केली.

Powered By Sangraha 9.0