एसटीच्या ताफ्यात नवीन ई-बसेस दाखल होणार

04 Oct 2023 15:49:51

msrtc

मुंबई :
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या (ST) ताफ्यात पाच हजार नवीन इलेक्ट्रिक बसेस दाखल होणार आहेत. वाढता इंधन खर्च लक्षात घेता एस टी महामंडळाचा इलेक्ट्रिक बसेस सुरु करण्याचा हा निर्णय महत्वाचा आहे. नवीन दाखल होणाऱ्या या गाड्यांचे प्रवास दर सर्व सामान्यांना परवडणारे असणार आहे.

तरी या बस तयार करण्याचे काम ऑलेक्ट्रा कंपनिला मिळाले आहे. तसेच एसटीच्या नवीन ई-बसेस संदर्भात निर्णय घेण्यासाठी राज्य सरकारकडून एक समिती स्थापन करण्यात आली आहे. त्यामुळे आता 'लालपरी'चा प्रवास स्वस्त आणि आरामदायी होणार आहे.

संप आणि संपानंतरच्या झालेल्या अनेक घटना घडामोडी पाहता एसटी महामंडळाचे सक्षमीकरण करणे, गतिमानता वाढवणे, अपघाताचे प्रमाण कमी करणे, प्रवाशांच्या सोयीसाठी बसच्या फेऱ्या वाढवणे, प्रवाशांना आरामदायक सुरक्षित लांब पल्याचा प्रवास करण्यासाठी नवीन पद्धतीच्या बस उपलब्ध करून देणे असे अनेक उद्दिष्ट समोर ठेवून एसटी महामंडळ नवीन पद्धतीने काम करत आहे.

Powered By Sangraha 9.0