राणा अय्युबच्या खोटेपणाचा बुरखा फाटला!

04 Oct 2023 19:02:47
RANA AYYUB 
 
मुंबई : पत्रकार राणा अय्युब यांचा हिंदूंविरोधी अपप्रचार करण्याचा आणि भारतविरोधी कारवायांमध्ये सहभागी असलेल्या ‘पत्रकारांचा’ बचाव करण्याचा इतिहास आहे. अंमलबजावणी संचालनालय आणि दिल्ली पोलिसांनी चीन-अनुदानित न्यूजक्लिकच्या विरोधात नुकत्याच केलेल्या कारवाईवर टीका करताना राणा अय्युब यांनी जाणूनबुजून खोटी माहिती शेयर केली.
 
राणा अय्युब यांनी एका ट्विटमध्ये दहशतवाद विरोधी कायद्याखाली अटक करण्यात आलेल्या पत्रकारांची नावे शेयर केली. यामध्ये राणा अय्युब यांनी रुपेश कुमार सिंग, फहाद शाह, आसिफ सुलतान, इरफान मेहराज, माजिद हैदरी, गौतम नवलखा, मनन दार, सजाद गुल या पत्रकारांची नावे दिली.
 
राणा अय्युब यांनी आपल्या ट्विटमध्ये मुद्दाम या ६ पत्रकारांना अटक करण्याचे कारण सांगितले नाही. या सर्वांचा उल्लेख त्यांनी ‘निर्दोष पत्रकार’ असा केला. पण या सर्व पत्रकारांवर देशविरोधी कारवाया केल्याचा आरोप आहे. या तथाकथीत पत्रकारांना दहशतवादी गटांना निधी पुरवणे, बेकायदेशीर विदेशी निधी मिळवणे आणि गुन्हेगारी कट रचणे यासह विविध गंभीर आरोपांखाली अटक करण्यात आलेली आहे.
 
या सहा पत्रकारांविरोधात तपास यंत्रणांकडे सबळ पुरावे सुद्धा आहेत. तरीही राणा अय्युब या पत्रकारांचा उल्लेख ‘निर्दोष पत्रकार’ करतात. याआधीही राणा अय्युब यांनी अनेक वेळा फेक न्यूज प्रसारित केली होती. त्यांच्यावर या प्रकरणी कायदेशिर कारवाई देखील चालू आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0