BEL Recruitment 2023 : पदवीधरांना विविध पदांवर नोकरीची संधी; आजच अर्ज करा

04 Oct 2023 16:17:10
Bharat Electronics Limited Recruitment 2023

मुंबई :
'भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड'मधील रिक्त जागांच्या भरतीसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीच्या माध्यमातून तरुणांना नोकरीची संधी मिळणार आहे. भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडमधील विविध पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून विविध पदांसाठी अर्ज मागविले जात आहेत.

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड मधील “प्रोबेशनरी इंजिनिअर, प्रोबेशनरी ऑफिसर, प्रोबेशनरी अकाउंट्स ऑफिसर” च्या एकूण २३२ विविध रिक्त जागा भरण्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाईन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख २८ ऑक्टोबर २०२३ असणार आहे.

तसेच, या रिक्त जागेच्या भरतीसाठी उमेदवारांना शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. तर अर्जदारांची वयोमर्यादा २५– ३० वर्षेदरम्यान असणे बंधनकारक असेल. तसेच, अर्जदारास परीक्षा शुल्क आकारले जाणार असून १००० रुपये असणार आहे. भरतीविषयक अधिक तपशील माहिती जाणून घेण्यासाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या.



Powered By Sangraha 9.0