अमित दुबेंची भाजपच्या वसई-विरार जिल्हा सचिवपदी नियुक्ती

04 Oct 2023 15:38:06
 amit dube

वसई : भाजपच्या वसई-विरार जिल्हा सचिवपदी अमित दुबेंची नियुक्ती झाली आहे. गेली अनेक वर्षे भाजपचा कार्यकर्ता म्हणून सार्वजनिक जीवनात काम करताना मला समाधान वाटते. माझी जिल्हा सचिव पदावर नियुक्ती केल्याबद्दल मी संपूर्ण भाजपा वसई विरार जिल्हा कार्यकारिणीचे मनःपूर्वक आभार मानतो. मी माझी जबाबदारी पूर्णपणे पार पाडेन, असे अमित दुबे यांनी म्हटले.

वसई-विरारचे जिल्हाध्यक्ष महेंद्र पाटील यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. गेली अनेक वर्ष राजकीय क्षेत्रात सक्रियपणे कार्यरत आहात. वसई विरार जिल्ह्यात पक्ष संघटन अधिक मजबूत करण्यासाठी आपण परिश्रम घेऊन ही जबाबदारी यशस्वीरीत्या पार पडाल असा विश्वास आहे.

Powered By Sangraha 9.0