‘कार्बन न्युट्रल कॅम्पस’कडे मुंबई विद्यापिठाची वाटचाल

31 Oct 2023 17:23:32




mumbai university carbon neutral campus




मुंबई (विशेष प्रतिनिधी): लाखो विद्यार्थ्यांना शिक्षण देणाऱ्या विद्यानगरी कलिना येथील मुंबई विद्यापिठाचे आवार कार्बन शुन्य करण्याच्या दृष्टीकोनातुन प्रयत्न सुरू केले गेले आहेत. कलिना येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनच्या सभागृहात घेतलेल्या बैठकीत मंगळवार दि. ३१ ऑक्टोबर रोजी सर्व विभागप्रमुख व संचालक यांना पर्यावरण तज्ञ डॉ. नंदकिशोर जोशी यांनी मार्गदर्शन केले.


मुंबई विद्यापिठाचे आवार कार्बन न्युट्रल करण्याच्या दृष्टीकोनातुन विद्यापिठाचा एनएसएस विभागाबरोबर सर्व विभागांनी एकत्र येऊन काम करावे या दृष्टीकोनातुन विभाग प्रमुख आणि इतर प्राध्यापकांना मार्गदर्शन केले जात आहे, अशी माहिती विद्यापिठाचे एनएसएस प्रोग्रॅम ऑफिसर डॉ. विश्वंबर जाधव यांनी सांगितले. मुंबई विद्यापिठाचे कुलगुरू प्राध्यापक रवींद्र कुलकर्णी यांच्या संकल्पनेतुन साकारलेल्या कार्बन न्युट्रल कॅम्पस या प्रकल्पामार्फत आवारात निर्माण होणारा कचरा, प्लास्टिक, कार्बन फुटप्रिंट, वाया जाणारे सांडपाणी यासारख्या विषयांवर काम करून विद्यापिठ कॅम्पस कार्बन न्युट्रल म्हणजेच कार्बन शुन्य करण्यासाठी विद्यापीठ प्रयत्नशील आहे. सप्टेंबर महिन्यात सांडपाण्यावर प्रक्रिया करणारा प्रकल्प सुरू करण्यात आला. त्याचबरोबर वर्मीकंपोस्टींगचा प्रकल्प ही आवारात सुरू करण्यात आलेला आहे. “आपण विद्यापिठात करत असलेला कचरा ही आपलीच जबाबदारी आहे हे लक्षात घेऊन विद्यार्थ्यांमध्ये त्याविषयी जनजागृती करायला हवी”, असे डॉ. नंदकिशोर जोशी यांनी सांगितले. विद्यापिठातील विभागप्रमुखांची बैठक घेऊन त्यांना यामध्ये कोणकोणते उपक्रम करता येतील याबद्दल कृतीआराखडा तयार करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. प्लास्टिक मुक्त आवार, कार्बन न्युट्रल आवार आणि आवाराचे सुशोभीकरण ही तीन उद्दीष्टे सफल करण्याच्या दृष्टीकोनातुन विद्यापीठ आणि कुलगुरू प्रयत्नशील आहेत. 



विद्यापिठाचे नव्याने मंजूर झालेले एमओयु :

१) विद्यापीठ परिसरात गुरूकूल उभारण्याची तयारी. पारंपारिक शिक्षण पद्धतीचा विद्यार्थ्यांना घेता येणार आनंद.

२) मुंबई विद्यापिठ कार्बन न्युट्रल कॅम्पस प्रकल्पांतर्गत मियावाकी जंगलांची निर्मिती.

३) एनएसएस आणि मुंबई विद्यापीठ यांच्या मार्फत रिसायक्लिंगचा भारतातील पहिला स्टार्टअप

“मी नेट झिरोसाठी वैयक्तिक पातळीवर काय करतो याचा विचार करा. मी चिमणी होतो आणि मी आग विझवण्याचा प्रयत्न केला असे समजुन आपले काम करा. लहान प्रयत्नांचे मोठे परिणाम दिसुन येतात.”

- डॉ. नंदकिशोर जोशी
पर्यावरण तज्ञ
Powered By Sangraha 9.0