आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावा, आम्ही तुमच्यासोबत आहोत: उद्धव ठाकरे

31 Oct 2023 12:49:31
 
Uddhav Thackeray
 
 
मुंबई : आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावा, आम्ही तुमच्यासोबत आहोत. असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत मराठा आरक्षण आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर भाष्य केले. विधानसभा अध्यक्षांना न्यायालयाचे आदेश समजावून सांगा. न्यायालयाच्या भुमिकेवर सर्वाचं लक्ष आहे. मराठा आरक्षणाचा विषय चिघळलेला आहे. तोडगा निघाला नाही तर ४८ आमदारांनी एकत्रित राजीमाना द्यावा. असं ठाकरे म्हणाले.
 
आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना ठाकरे म्हणाले, "स्वराज्य जळत असताना प्रचार महत्त्वाचा आहे. महाराष्ट्रात सध्या अस्वस्थता आहे. काहीही करा पण मार्ग काढा. आम्ही तुमच्यासोबत आहोत. मराठा समाज कुणाच्या ताटातलं काही घेणारा नाही. विशेष अधिवेशन बोलावून प्रश्न सुटत असेल तर संसदेचं विशेष अधिवेशन घ्या, प्रश्न मार्गी लावा. मराठा समाजाला त्यांचा न्याय आणि हक्क मिळाला पाहिजे. मराठा आरक्षणावर युतीने नेमलेले वकील मविआ ने कायम ठेवले होते. केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीत आरक्षणाचा मुद्दा घ्या. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मी पंतप्रधान मोदींना भेटायला तयार आहे, पण ते चर्चा करायला तयार आहेत का?" असा सवाल ठाकरेंनी उपस्थित केला.
 
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर बोलताना ठाकरे म्हणाले, "कोर्टाच्या आदेशामुळे लोकशाहीला न्याय मिळेल. ३१ डिसेंबरपर्येत अपात्रतेचा धोका असल्याने राजीनामा देत आहेत. गद्दारीचा शिक्का पुसण्यासाठी काहींचा राजीनामासत्र सुरू आहे. तोडगा निघाला नाही तर ४८ आमदारांनी एकत्रित राजीमाना द्यावा. सर्वोच्च न्यायालयाने नार्वेकरांना आदेश दिला आहे. आपल्याकडे तो आदेश आला आहे. नार्वेकर म्हणाले, मी आदेश वाचला नाही. त्यामुळे मी हा आदेश वाचून दाखवत आहे. मी माझ्या आमदारांना सांगणार आहे की, जर नार्वेकर मुंबईत असतील तर त्याची कॉपी त्यांना द्या आणि त्यांच्यासमोरही वाचन करा." असं ठाकरे म्हणाले आहेत.
 
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0