मुकेश अंबानी यांना सलग तिसरी धमकी. ४०० कोटींच्या खंडणीची मागणी

31 Oct 2023 15:13:03
 
मुकेश अंबानी यांना सलग तिसरी धमकी. ४०० कोटींच्या खंडणीची मागणी
 
मुंबई: रिलायन्स उद्योगसमुहाचे ख्यातनाम उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या जीवाला धोका असल्याची चर्चा माध्यमातून सुरू आहे. गेल्या वर्षीही अंबानी यांच्या घराजवळ स्फोटके भरलेली गाडी आढळली होती. याच पार्श्वभूमीवर गेले काही दिवस अंबानींना जीवे मारण्याची धमकी ई मेल द्वारे मिळत आहे. याआधी पहिल्या मेलमध्ये २० कोटी दुसऱ्या मेलमध्ये २०० कोटी व आता नव्या मेलमध्ये ४०० कोटींची मागणी करण्यात आली आहे.
 
यापूर्वी गावदेवी पोलिस स्थानकात अज्ञात व्यक्तींविरोधात एफआयआर नोंदवण्यात आला होता. याविषयी मुंबई पोलीस, सायबर टीम, क्राईम ब्रांच अधिक तपास करत आहे.
 
Powered By Sangraha 9.0